
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):निमगाव केतकी येथील इयत्ता सहावी मध्ये शिकणारा आयुष्य आदलिंग हा विद्यार्थी गोतोंडीला जाण्यासाठी बसच्या पाठीमागे धावताना पडला आणि जखमी झाला त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची होणारी गैरसोयीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
याच पार्श्वभूमी वरती आज इंदापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने अगर व्यवस्थापक हनुमंत गोसावी तसेच प्रभारी आगार व्यवस्थापक परशुराम भोसले यांना निवेदनाद्वारे बस फेऱ्या वाढविण्याची मागणी केली आहे, हे निवेदन वरिष्ठ लिपीक तैशिफ शेख यांनी स्वीकारले.तरी १ महिन्याच्या आत आमच्या मागणीचा विचार न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना इंदापूर तालुका यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असे या निवेदनात म्हटले आहे.
शाळा, महाविद्यालये चालु असून इंदापूर आगाराकडून मात्र कमी बस असल्याकारणाने खेडेगावातील शालेय विद्यार्थ्यांची ताराबंळ होत आहे. ग्रामीण भागातून निमगाव, इंदापूर तसेच बारामती या शहरांमध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु इंदापूर – बारामती रोड वरती बस संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत आहे.इंदापूर आगारातील कमी बस सेवेमुळे शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी कमी बस असल्याने विद्यार्थ्यांना तासनतास बसावे लागत आहे. इंदापूर आगारातील केवळ ५० गाड्यांनीच संपूर्ण प्रवाससेवा सुरू आहे.याबाबत इंदापूर आगाराच्यावतीने पुढाकार घेऊन जास्तीत जास्त बस फेऱ्या वाढविण्याची मागणी इंदापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे व इंदापूर तालुका विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राजू भोंग यांनी निवेदनाद्वारे केली आहे.