
दैनिक चालू वार्ता अहमदपूर तालुका प्रतिनिधी
श्री हाणमंत जी सोमवारे
======================
*लातुर जिल्हा /अहमदपूर*:- तालुक्यातील
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई दक्षिण येथे अहमदपूर येथील उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे मॅडम यांच्या शुभहस्ते शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे मॅडम यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा दुसरा घेण्यात आला. विविध स्टॉल उभारून सर्व प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे विकास पत्र भरण्यात आले. प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे कुंकवाच्या पाण्यात पावलांचे ठसे घेण्यात आले. विद्यार्थ्यांना एक वृक्ष भेट देऊन वृक्षारोपण करण्यात आले.कु. ऐश्वर्या शिवाजी बारोळे या विद्यार्थिनीचे स्वरचित ‘आठवणीचे क्षण’ हे काव्यसंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल उपविभागीय अधिकारी मनीषा लटपटे मॅडम यांनी विद्यार्थिनीचा सत्कार केला.विद्यार्थ्यांना बालुशाही हा गोड पदार्थ देण्यात आला. याप्रसंगी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे साहेब, तालुक्यातील दुर्गम व वाढीवस्त्यावरील विद्यार्थ्यांना भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान प्राप्त करून सामाजिक वातावरणात ज्ञान कसे वापरावे याचे प्रत्ये या शाळेचे शिक्षक सुर्यकांत बोईनवाड हे एक उदाहरण व हे एक उत्तर उत्कृष्ट म्हणून कर्मचारी म्हणून काम केले याचे प्रत्येक हेच आपल्याला पाहायला मिळते असे प्रतिपादन तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी व्यक्त करताना बोलत होते
तर यावेळी सांगवी केंद्रप्रमुख खंदारे साहेब, तलाठी महेश गुपिले साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका सूर्यवंशी के.डी. सहशिक्षक सूर्यकांत बोईनवाड, प्रकाश हिंगणे, निवृत्ती शिवणे,रुस्तुम चव्हाण, संदीप कोटापल्ले मुजाहिद शेख उपस्थित होते. तसेच गावातील उषाताई गंगाधर देवकते, दत्तात्रय सुरनर ,महबूब शेख, आजीजबी सय्यद,आबेदाबी आतार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य व माता पालक, विद्यार्थी उपस्थित होते.