
एडवोकेट मानसी हक्के संस्था पदाधिकारी अहमदपूर
दैनिक चालू वार्ता अहमदपूर तालुका प्रतिनिधी
श्री हाणमंत जी सोमवारे
======================
*लातूर जिल्हा अहमदपूर*:-
तालुक्यातील लातूर अहमदपूर महामार्ग हायवे लगत असलेल्या निवासी अपंग विद्यालय अहमदपूर येथे आज नवागताचे स्वागत व दिव्यांग विद्यार्थी यांचे सर्वसामान्य मुलाप्रमाणे शिक्षणाचे दारे स्वातंत्रपणे उघडे असल्याची जाणीव आज मात्र निश्चित झाली असे आश्वासन तथा भावना व्यक्त करताना निवासी अपंग विद्यालय च्या संस्था पदाधिकारी सौ मानसी हक्क यांनी व्यक्त करताना दिसून आले,
सविस्तर माहिती अशी कि अहमदपूर तालुक्यातील गणेश दादा हाके यांच्या संस्थेतील अंतर्गत निवासी अपंग विद्यालय अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 15 जून 2024 रोजी निवासी अपंग विद्यालय चे मुख्याध्यापक श्री परमेश्वर पाटील व बालाजी फुलमन्टे सर यांच्या विशेष प्रयत्नाने आज शाळेत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पाल्यांचा समावेशन असा एक भारगच्च स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पदाधिकारी मानसी हक्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिसून आले यावेळी गट साधन केंद्रातील विशेषतज्ञ मोघे यांनी दिव्यांग मुल हे स्वातंत्रपणे व प्रखर त्यांना बाह्य ज्ञान देण्यासाठी स्वातंत्र्य वेळ द्यावे असे प्रतिपादन करताना बोलत होते तर यावेळी गट साधन केंद्रातील समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत श्री सोमवारे हनुमंत गोविंदराव यांनी मात्र वास्तविक जीवन व वास्तविक शिक्षण कौशल्य कसे गॅस करावे याबाबत मात्र सविस्तर वर्णन करताना बोलत होते
तर शाळेचे मुख्याध्यापक श्री परमेश्वर पाटील यांनी विद्यार्थ्यांची वास्तविक जीवन व शिक्षण आणि नवीन काहीतरी शिकण्याचे उम्मीद अशा अनेक उदाहरण ची मुलांकडून व पालकांच्या समक्ष बोलताना दिसून आले तर या संस्थेतील कर्मचारी बालाजी फुलमन्टे यांनी विशेष परिश्रम घेतले तर घेताना दिसून आले तर संबंध शाळेचे कर्मचारी व पालक या ठिकाणी उपस्थित होते तर शाळेतील विद्यार्थी व सर्व कर्मचारी वंदृ उपस्थित होते.