
केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतकऱ्यांना कवडी मोलाचे भाव देत असल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही म्हणून कापूस हेच योग्य पीक राहील असे प्रतिपादन हासर्णीचेे शेतकरी यांनी व्यक्त करताना बोलत होते *श्री गेनू गंगाराम तीडोळे एक सर्वसामान्य शेतकरी*
======================
*दैनिक चालू वार्ता अहमदपूर तालुका प्रतिनिधी
श्री हाणमंत जी सोमवारे*
======================
*लातूर जिल्हा /अहमदपूर*:- तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पाउस पडतो आहे तालुक्याच्या ठिकठिकाणी काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी संमिश्र पद्धतीने शेतकऱ्यांना आनंद उत्सव करण्यासारखा दिसून येत आहे तर काल दिनांक 14 जून 2024 रोजी तालुक्यातील अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडताना दिसून येत आहे यावेळी शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करत असताना उडीद मूग तूर हा शेतकऱ्यांना दिलासादायक उत्पादन म्हणून गणल्या गेले याची प्रचिती म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड करताना दिसून येत आहेत
तर यावर्षी सर्वात जास्त कापूसाला चांगला भाव उत्पादन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड करताना पाहायला मिळून आले यावेळी अहमदपूर तालुक्यातील हाडोळती जिल्हा परिषद गणांतर्गत येणारे गावे व त्याअंतर्गत शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया देत चांगल्या पद्धतीने पेरणी करताना दिसून आले आहे