
माजी आ.टी पी कांबळे यांचे दुःखद निधन
(हेर मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून जनतेच्या हितासाठी आपले योगदान दिले आहे.)
(मांतग समाजातील एक निर्भीड कार्याक्षम राजकीय नेतृत्व गमावले हे खंतच आहे..
*मा ऍड टि एन कांबळे , माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद लातूर यांचे प्रतिपादन*)
======================
*दैनिक चालू वार्ता अहमदपूर तालुका
प्रतिनिधी श्री हाणमंत जी सोमवारे*
======================
*लातूर जिल्हा/अहमदपूर*:- लातूर जिल्ह्यातील एक शेकाकोळ वातावरण निर्माण झाले आहे
सविस्तर माहिती अशी कि
मातंग समाजातील अतिशय अनुभवी अतिशय संयमी मनमिळाऊ स्ठवभाव व समाजाची जाण असणारे एक अनुभवी व्यक्तीमत्व आज आपल्यातून निघून गेलेल आहे , आ.टी.पी कांबळे साहेब हे कधीच समाजाचाची नाळ न सोडलेले नेते होते ते कधीच स्वतःला समाजापेक्षा मोठे समजले नाहीत, कित्येक दशकांपासून मातंग समाजामध्ये आमदार म्हंटले कि फक्त टी पी कांबळे साहेब हे एकच नाव सर्वाच्या तोंडात असायच, हेर मतदार संघात दोनदा आमदार होण्याचा भाग्य त्यांना लाभले, आम्ही लहानपणापासून म्हणजे गेली 30 ते35 वर्षापासुन स्व. टी पी कांबळे हे समाजाच्या अधिकार्यांबद्धल त्यांना फार अभिमान वाटत असत ते अधिकार्यांना अतिशय मान सन्मान देत असत, अत्यंत साधी सरळ राहणीमान असल्याने ते समाजाला अतिशय प्रिय व आपलेस वाटत असत, महाराष्ट्रातील मोठमोठ्या नेत्यांशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते, महाराष्ट्रातील अनेक लोकसभेच्या व विधानसभेच्या प्रचाराचे ते स्टार प्रचारक होते
स्व टी पी कांबळे साहेबांचा फार मोठा चाहता वर्ग महाराष्ट्रात आहे त्यांच्या तालमीतून अनेक नेते कार्यकर्ते घडले आहेत “टी पी आण्णा” हे नाव सर्वांच्या तोंडात असायच
स्व.टी पी कांबळे साहेबांचे जाण्याने समाजाचे फार मोठी हानी झालेली आहे समाज त्यांना कधीच विसरू शकणार नाही , भविष्यात जेंव्हा जेंव्हा हेर मतदार संघाचा ईतिहास वाचला जाईल तेव्हा तेंव्हा टी पी कांबळे साहेबांच्या नावाशिवाय ते ईतिहास कधीच पूर्ण होणार नाही
स्व टी.पी कांबळे साहेब जाण्याने समाजात फार मोठी पोकळी निर्माण झालेले आहे ती कधीच भरून निघणार नाही
*मी डाॅ.आर एस देवणीकर* समस्त देवणीकर परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
सर्व स्तरातून हाळहाळ व्यक्त होताना दिसून येत आहे..