
दै चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
नांदेड/उमरी :-नायगाव विधानसभा मतदार संघांचे लोकप्रिय शेतकरी नेते मा. मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नव्यानेच सुरुवात झालेल्या व्यंकटराव पाटील कवळे विद्यालय कुसुमनगर वाघलवाडा. ता. उमरी जि. नांदेड येथील शाळेत आज दि १५ जून शनिवार रोजी शाळेचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सत्रातील पहिल्या दिवसाची सुरुवात अतिशय आनंदी वातावरणात शाळेच्या मुख्य प्रवेश दारावर मा.संदीप पाटील कवळे कार्यकारी संचालक व्ही. पी. के उद्योग समूह यांच्या हस्ते रिबीन फीत कापून तसेच शालेय विध्यार्थांना पुष्प गुच्छ, चॉकलेट देऊन करण्यात आली. यावेळी श्री. आंबटवार साहेब, श्री. पवार साहेब, श्री. यु.जी. कदम सर, सालेगाव, बेलगुजरी, बोरजून्नी, कारेगाव येथील पालक,शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .