
दैनिक चालू वार्ता अहमदपूर तालुका प्रतिनिधी
श्री हाणमंत जी सोमवारे
======================
*लातुर जिल्हा/अहमदपूर*:-
महाराष्ट्रातील ओबीसींच्या न्याय हक्काच्या आरक्षणासाठी प्रा. लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला अहमदपूर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी जाहीर पाठींबा दिला असून तात्काळ मागण्या मान्य करण्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
वडगोद्री ता. आंबड जी. जालना येथे ओबीसी आरक्षण संदर्भात गेल्या एक आठवड्यात पासून आमरण उपोषण सुरू असल्याने लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांची तब्बेत खालावली असल्याने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अन्यथा अहमदपूर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे तिव्र आंदोलन करण्याचा लेखी इशारा अहमदपूर येथील ओबीसी समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार अहमदपूर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना देण्यात आले आहे.
सदरील निवेदनावर ज्ञानोबा बडगिरे, गोविंद गिरी, बालासाहेब होळकर, नाथराव केंद्रे, बाळू मुंडे, माणिक नरवटे,रामानंद मुंडे, दत्ता खंदाडे, यशवंत केंद्रे,हणमंत देवकते,गोपीनाथ जायभाऐ, संतोष होळकर, संग्राम नरवटे, रामचंद्र चिगळे, काशीनाथ स्वामी, बालाजी पुरी, शंकर देवकते, बालाजी हेमनर, राजू नरवटे, रवी सिरसाठ, बाबु पांचाळ, राजू काडंनगिरे, हरीभाऊ सोटगिर,लखन घोडके, भास्कर केंद्रे, गजेंद्र वलसे,कुलदीप हाके, प्रभाकर चंदेवाड,मिलींद तेलंगे,मंगेश नागरगोजे यांच्या सह असंख्य ओबीसी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.