
दै. चालू वार्ता, पैठण प्रतिनिधी,
तुषार नाटकर-
पैठण : विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे कागदपत्र मिळत नसल्याबाबत तसेच विद्यार्थ्यांची व पालकांची होणारी पिवळणूक तात्काळ थांबवावी यासाठी छावा क्रांतीवीर सेना व अखिल भारतीय छावा संघटना यांनी संयुक्तरीत्या आज दि. 18 जुन रोजी तहसीलदार पैठण यांना निवेदन दिले आहे.
यापूर्वी सदर प्रकरण विषयी छावा क्रांतिवीर सेनेमार्फत दि.22/12/2023 रोजी तहसील कार्यालय समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले होते. तीव्र स्वरूपाचे आंदोलन करूनही तहसील मधील कर्मचारी यांना या गंभीर बाबी विषयी जागरूकता दिसून आली नाही. अद्यापर्यंतही तहसील कार्यालयामार्फत कोणतीही शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, डोमेसाईल, नॅशनॅलिटी, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, उत्पन्न, रहिवाशी इ. मिळत नाही व हे कागदपत्रे काढण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना मानसिक व आर्थिक स्वरूपात भुर्दंड बसत आहे. कारण सीएससी सेंटर तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी जास्तीचे पैसे मागतात, पैसे न दिल्याने विद्यार्थ्यांना व पालकांना या तकलादू गोष्टींना नाहक सामोरे जावे लागत आहे. कर्मचारी मुद्दामून विद्यार्थ्यांचे अडवणूक करत आहे नवीन कर्मचारी रजेवर जातात. शैक्षणिक वर्ष असल्याने या विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांना रजा देण्यात येऊ नये तसेच शैक्षणिक कागदपत्रे वेळेवर मिळण्यासाठी पर्यायी इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यात यावी प्रमुख्याने इंटरनेट असुविधेचे कारण समोर येत आहे. त्यामुळे होणारी पिळवणूक तात्काळ थांबवण्यासाठी छावा क्रांतिवीर सेना व अखिल भारतीय छावा यांच्या संयुक्तरीतीने सोमवारी दि.24/06/2024 रोजी पैठण तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत व तालुकाध्यक्ष किशोर सदावर्ते यांनी सांगितले आहे.
यावेळी उपस्थित मराठवाडा सचिव भगवान सोरमारे, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ शिंदे, पैठण शहराध्यक्ष साईनाथ कर्डिले, जिल्हाप्रमुख कृष्णा काळे, सचिन गवारे, भाऊराव धरम, ज्ञानेश्वर गिरगे, परमेश्वर बुरंगळ, अर्जुन कदम, राकेश वाघे आदीं उपस्थित होते.