
दै. चालू वार्ता,
पैठण प्रतिनिधी,
तुषार नाटकर-
पैठण : तालुक्यातील श्री चांगदेव विद्यालय चांगतपुरी प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पवार व योगशिक्षक श्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘करे योग रहे निरोग’ उक्तीप्रमाणे मानवी जीवनामध्ये योगाचे असणारे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व आंतरराष्ट्रीय योगा दिवस आपण का साजरा करत आहोत, याविषयी मार्गदर्शन करून योगाचे प्रात्यक्षिक सर्व शिक्षकासह विद्यार्थ्याकडून करून घेतले या कार्यक्रमास एकूण मुले- 259 पैकी हजर 239 व एकूण शिक्षक 9 पैकी हजर शिक्षक 9 तर शिक्षकेतर कर्मचारी 4 हजर होते. याप्रसंगी शाळेमध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.