
दै चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
नांदेड/उमरी:-व्हिपीके उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष,तथा नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत उमरी तालुक्यातील बितनाळ येथील शेतकरी कै.गोविंदराव देवराव मंतलवाड व जिरोणा येथिल कै प्रकाश पुंडलिक आकुलवाड हे दोन्ही तरुण शेतकरी आत्महत्या झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन पर भेट देवून त्यांच्या कुटुंबियांच्या वारसांना आर्थिक मदत केली.व्हिपिके पतसंस्था ही नांदेड जिल्ह्यात कार्यरत असतांना ही संस्था आपला केवळ नफा न पाहता झालेल्या नफ्यातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते त्यांचाच एक भाग म्हणून आज बितनाळ व जिरोणा येथे केली मदत यावेळी बितनाळ चे सरपंच मारोतराव उमाटे, माजी सरपंच मारोतराव वाघमारे, उपसरपंच देवीवास आकमवाड, सदस्य गोविंद डुबुकवाड,जिरोणा गावातील सरपंच तसेच गावातील डी.जी.तुपसाखरे, संजय चूनुकवाड सह बितनाळ जिरोणा गावातील शेतकरी उपस्थित होते