
दि.२१ ते २७ जून योग सप्ताह शिबीराचे आयोजन
दै.चालु वार्ता,
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :* उदगीर येथील लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात १० वा आंतरराष्ट्रीय योगदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त व योगदिन सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शीका सौ.मानसी चन्नावार यांनी अत्यंत उत्तमरितीने योगसाधनेचे महत्व सांगताना प्रत्यक्ष योगक्रिया करून दाखवल्या.यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सुद्धा यात कृतियुक्त सहभाग घेतला.
उपमुख्याध्यापक श्री.संजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शनात योगदिनाचे महत्व सांगतांना योग करतांना नियमांचे महत्व विषद केले व सर्वांनी निरोगी राहण्यासाठी योगाचा अंगीकार करावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.कृष्णा मारावार यांनी अध्यक्षीय समारोपात योगदिनाचा इतिहास सांगतांना संपूर्ण जगाने योगाचे महत्व जाणून आरोग्यदायी जीवनासाठी योगक्रियांचा दैनंदिन जीवनात स्विकार केला.आपण सुद्धा निरोगी व निरामय आरोग्यासाठी योग क्रियांचे आचरण करावे असे सांगितले.
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.कृष्णा मारावार हे होते.प्रमुख मार्गदर्शिका योगगुरू सौ.मानसी चन्नावार ,स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मा.श्री.मधुकरराव वट्टमवार,स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह मा.श्री.शंकरराव लासुने,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री.संतोष खरोबे,सदस्य श्री.संजय चव्हाण, उपमुख्याध्यापक श्री.संजय कुलकर्णी , पर्यवेक्षक श्री.माधव मठवाले ,श्री.राजकुमार म्हेत्रे, राम चन्नावार, योगशिक्षिका हिमाली मोरे,आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक श्री.संतोष कोले यांनी तर आभार श्री.संदीप जाधव व कल्याणमंत्र श्री.बालाजी पडलवार यांनी सांगितला .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधु -भगिनी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.