
दैनिक चालू वार्ता
उपसंपादक नागपूर
शंकर सालोडकर
नागपूर : भारतरत्न किशोर कुमार ग्रुपने इंडियन आयडॉल, सीझन 2024, “ज्युनियर” फेसबुक ऑनलाइन गायन स्पर्धा, (कोलकाता) च्या अंतिम फेरीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये किशोर दा ऑल इंडिया फॅन ग्रुप च्यावतीने कु.आराध्या अजय सिंग टाँक नागपूर (महाराष्ट्र) हिला “चॅम्पियन” घोषित करण्यात आले. या स्पर्धेत 14 मुलांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून एक मेव विजेता म्हणून आराध्या ला घोषित करण्यात आली. शेवटच्या थांब्यावर तीन फेऱ्या झाल्या. मलेशिया, पाकिस्तान, नेपाळ, भूतान इत्यादी देशांमध्ये हा शो लोकप्रिय आहे. ज्यात आराध्या टाँक ला चॅम्पियन घोषित करण्यात आले. किशोर दा यांनी गायलेल्या गाण्यांनी अंग भरून आले. पाचव्या सहभागीची अंतिम फेरी तारीख. 23, 24, 25 फायनल्स 26 जून रोजी, रात्री 10:30 वाजता च्या सुमारास चॅम्पियन विजेता घोषित करण्यात आला. विशेष : म्हणजे आराध्या ला उच्च स्तरावरून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच आपण सर्वांनी दिलेलं प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत.