
दै चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे मार्फत घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सदर परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी तील राम काशिनाथ पोमनार या विद्यार्थ्याने (२५०/३००), स्नेहल ओंकार सरगर या विद्यार्थिनीने (२२६/३००) तसेच इयत्ता आठवी तील यश किसन टोणपे या विद्यार्थ्याने (२०८/३००), ज्ञानेश्वरी प्रविण पगार या विद्यार्थिनीने (२०४/३००), पूजा जनार्धन बाबर या विद्यार्थिनीने (१९६/३००) तर अनुष्का हनुमंत तापकीर या विद्यार्थिनीने (१९२/३००) गुण मिळवून सदर विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले असून शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत.
या सर्व यशस्वी व गुणी विद्यार्थ्यांचे व इयत्ता पाचवीचे समन्वयक संदीप वालकोळी, मार्गदर्शक शिक्षक सूर्यकांत मुंगसे, किसन राठोड, शारदा साबळे, संदीप वालकोळी, पौर्णिमा मोरे, छाया कु-हाडे, उज्वला कडलासकर, अतुल भांडवलकर, सुजाता गोगावले, आरती वडगणे, पूजा चौधरी, तायडे मॅडम, तसेच इयत्ता आठवीचे समन्वयक अमीर शेख मार्गदर्शक शिक्षक प्रशांत सोनवणे, हेमांगी उपरे, संजय उदमले, अनुज्यायिनी राजहंस, शशिकला वाघमारे, प्रमोद कुलकर्णी, राजश्री भुजबळ, मनीषा कुंजीर, यमुना कुऱ्हाडे, अमीर शेख, सोनाली कातोरे, अनुराधा खेसे, सायुज्यता तायडे, राजाभाऊ पानगावकर, स्वप्निल रंथवे, लीना नेमाडे, इम्रान शेख, शिवाजी जाधव या सर्वांचे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, किसन राठोड, सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.