दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर):राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागात घराघरात तसेच पारावर, मंदिरावर याच योजनेची चर्चा होत आहे. तर अनेक जावयांनी सासरेबुवांकडे प्रवेश निर्गम पाठवा, असे साकडे घातले आहे. या योजनेला पात्र ठरण्यासाठी आवश्यक कागदपत्र जमा करताना दोन्ही बाजुचे कुटुंब कामाला लागल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलेला दरमहा १५०० रुपये मानधनमिळणार आहे. दरम्यान, ही योजना जाहीर होताच ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत घराघरांत सध्या केवळ लाडक्या बहिणीचीच चर्चा रंगत आहे. प्रत्येकजण आपल्या घरातून किती महिला या योजनेच्या लाभार्थी ठरू शकतात, याचा कानोसा घेत आहेत. इतर योजनेच्या लाभार्थी नसलेल्या सर्वच महिला सध्या लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करताना दिसत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या / लाडक्या बहिणीच्या कागदपत्रांची पूर्तता करताना सध्या ‘दाजी’चा चांगलाच घाम निघत आहे. अनेक जावई सासुरवाडीला फोन करूनआपल्या मुलीचा प्रवेश निर्गम उतारा त्वरित पाठवा म्हणून साकडे घालत आहेत. तर, तिकडे गावात सासरेबुवा आणि सालेबुवा मुली आणि बहिणींच्या प्रवेश निर्गमासाठी शाळेचे उंबरठे झिजवत आहे एकाच वेळी अनेक प्रवेश उताराची मागणी होत असल्याचे मुख्याध्यापकांना दररोज प्रवेश रजिस्टरमध्ये ही नावे शोधण्याचे काम लागले आहे. प्रत्येकजण 2 आताच कागद द्या म्हणून हात जोडत आहेत, अशा वेळी या कागदासाठी आलेल्या प्रत्येकाचेच मन राखताना शाळा प्रशासनाची चांगलीच
कसरत होत आहे.
(जावा-जावांमध्ये चढाओढ)
मोठ्या कुटुंबात बैठका.
ज्या घरात जास्त महिला आहेत, अशा घरातून नेमक्या कोणत्या महिलांची या योजनेसाठी निवड करायची
यासाठी ही घरात बैठका बसत आहेत. तर, आपलेच नाव योजनेसाठी पुढे यावे म्हणून जावाजावांतही चढाओढ लागल्याचे चित्र आता दिसत आहे. दरम्यान, ही योजना प्रत्यक्षात किती फयदायी ठरणार आहे घराघरांतून मात्र लाडक्या बहिणीच्या या अनोख्या घराघरांतून मात्र चर्चा रंगू राहिल्या
लाडक्या बहिणींना, १ जुलैपासून बँक खात्यात पैसे देण्यात येणार आहे. त्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे