
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर) : परम पूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात *कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी बलिदान दिन साजरा करण्यात आला*.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बालासाहेब केंद्रे सर होते . प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक जयराम कडलवार, कोयलकोडवार, सुभाषराव सगर इत्यादी मान्यवर उपस्थित असुन,त्यांच्या हस्ते कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना सुरेशराव कुलकर्णी यांनी केले ,तर प्रमुख वक्ते म्हणून विद्यालयातील सहशिक्षक योगेश वझलवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, *भारतमातेची सेवा करण्यासाठी सर्वांनी तयार असणे गरजेचे आहे. घराघरांतून देशभक्त, सैनिक तयार झाला पाहिजे. विद्यार्थी जीवनातच शिस्त निर्माण झाली पाहिजे. देशभक्तीचे धडे विद्यार्थी जीवनातच घेतले पाहिजेत*.
अध्यक्षिय समारोपात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बालासाहेब केंद्रे सर यांनी कॅ. कृष्णकांत कुलकर्णी यांच्या बद्दल माहिती दिली. ज्ञानोपासक मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व परिचय दत्तात्रय मिरलवार यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने करण्यात आली.