
दैनिक चालु वार्ता
पाटोदा प्रतीनिधी सुनिल तांदळे
पाटोदा : आषाढी वारी निमीत्त भगवान गड ते पंढरपुर पायी वारी प्रती वर्षाप्रमाणे आज पाटोदा शहरात सकाळी दहा वाजता भगवानबाबा पालखी दाखल झाली. पाटोदा शहरातील नागरीकाबरोबरच पंचक्रोशीतील वारकरी, भक्तजन तसेच सर्व नागरीक भगवान बाबांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पाटोदा येथे उपस्थीत झाले होते. पादोदा येथील नागरीकांनी फुष्प, फटाके, लेझीम, बँड तसेच टाळ मृदंग इत्यादिचे आयोजन करुन हरी नामाच्या गजरात बाबांच्या पालखीचे भव्य पुष्पहार अर्पण करुन भव्य दिव्य स्वागत केले. शिवाजी चौक ते भामेश्वर मंदिर अशी मीरवणुक काढुन भामेश्वर मंदिर येथे पालखी भावीकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. यानंतर नगरपंचायत पाटोदा च्या अंगणात तसेच कन्याशाळा पाटोदा येथे वारकर्यांच्या भोजनाची उत्तम प्रकारे व्यवस्था केली होती. या भोजनाचा वारकर्यांबरोबरच जमलेल्या भाविकांनी देखील स्वाद घेतला.