
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर ); देगलूर
येथील विविध शासकीय कार्यालयात एजंटाचा सुळसुळाट झाला असून हे एजंट कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना कामे करून देतो म्हणून त्यांचे आर्थिक लूट करीत आहेत. अशा एजंटांना पाय बंद करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. देगलूर शहरातील विविध शासकीय कार्यालयात एजंटची संख्या वाढली आहे. शासनाच्या विविध योजनेतील कामे करून देण्याच्या नावाखाली अनेक तथाकथित यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्यात येत आहे. मी अमुक आहे माझी ओळख मंत्री आमदार, खासदार यांच्याशी असल्याच्या थापा मारून सर्वसामान्य नागरिकांची व महिला वर्गाची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे.
राज्य शासन व केंद्र शासनाच्या अनेक योजना राशन कार्ड ,उत्पन्नाचा दाखला ,रहिवाशाचा दाखला नॉन क्रिमिनल ,साठ वर्ष निराधार ,गोटा बांधकाम असे अनेक कागदपत्रे व शासनाच्या विविध योजना मिळवून देण्याच्या नावाखाली शासकीय कार्यालयात एजंटचा सुळसुळाट वाढला आहे. या एजंटांना अनेक
शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे मदत करत असतात. सर्वसामान्य नागरिकांचा लुटीचा धंदा हा बिनबोट सुरू आहे. सध्या शासनाच्या विविध योजना या ऑनलाइन मिळवण्याची प्रक्रिया आहे. पण एजंट हे नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना थेट योजना मिळवून देण्याचे आम्हीच दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत.
अनेक एजंट हे मोठ्या मोठ्या नेत्यामंडळीची मंत्र्याची लोकप्रतिनिधीच्या व अधिकाऱ्यांच्या ओळखीचे दाखले सर्वसामान्य नागरिकांना देत असतात. या त्यांच्या गोड बोलण्याला सर्वसामान्य नागरिक असतात. आशा एजंट वर कोणाचेच अंकुश नसल्याने यांचा धंदा जोमाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, रजिस्ट्री ऑफिस, कृषी विभाग अनेक शासकीय कार्यालयात एजंट चा धंदा सुरू आहे. या एजंटांना रोखण्याची मागणी देगलूर तालुक्यातील नागरिकांतून केली जात आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.