
अवधूत खडककर
उमरखेड जिल्हा यवतमाळ
उमरखेड:-तालुक्यातील ढाणकी पासुन जवळच असलेल्या स्नेहा गोल्ड कंपनीकडे कॅनल वरून ३३ के. व्ही. लाईनचे काम बंद करून सबंधीत एजन्सीवर कार्यवाही करण्याचे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाचे दोन महिन्यापूर्वीचे आदेश असतानाही उपकार्यकारी अभिंयता म.रा.वि.वि.म कंपनी ढाणकी कडुन कार्यवाही होत नसल्यामुळे काल दिनांक २७ रोजी तक्रारकर्ते मनसे तालूका अध्यक्ष सादिक शेख यांनी जिल्हाधिकारी यांना स्मरणपत्र निवेदन दिले असता येत्या १० दिवसात कार्यवाहीचे निर्देश न दिल्यास विज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे .
जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनानुसार पाटबंधारे विभागाच्या क्षेत्रात कॅनलवर स्नेहा गोल्ड कंपनीने कुठलीही परवानगी न घेता ५४ पोल उभे केले .या अनाधिकृत पोलमुळे भविष्यात कालव्याच्या देखभालीसाठी अडथळा निर्माण होणार विभागीय म्हणुन उपविभागीय अधिकारी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाकडे उमरखेड मनसे कडुन तक्रार अर्ज उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र . २ करण्यात आला होता तक्रारीची दखल घेत उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उपविभागीय अधिकारी उमरखेड यांनी २८ जुन २०२४ रोजी ढाणकी विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना कालव्याच्या दुरूस्तीसाठी कामाच्या वेळी येणा-या अवजड मशनरी आल्यानंतर उभे करण्यात आलेल्या पोलमुळे काम करण्यास अडथळा निर्माण होणार असुन पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात ही पोल विनापरवागी उभा करण्यात आल्याने हे पोल त्वरीत काढुन टाकण्यात यावे असे निर्देशाचे पत्र दिले होते. मात्र आजपावेतो उपकार्यकारी अभियंता यांनी या प्रकरणाची दखल घेवुन तात्काळ विनापरवानगी उभे करण्यात आलेले ५४ पोल (खांबे)हटविण्याची तसेच विनापरवाना पोल उभे करणा-या एजन्सीजवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते . मात्र दोन महिने उलटूनही ढाणकी येथील विज वितरण कंपनीचे अभियंता हे त्या अनधिकृत पोल उभे केलेल्या कंपनी विरोधात कार्यवाही करण्यास टाळाटाळ करित आहेत . म्हणून जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे निवेदनातून अनधिकृत ५४ विजेचे खांब काढुन संबंधीत ढाणकीच्या विज वितरण कंपनीच्या अभियंत्यावर व संबंधीत एजन्सीज व ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे . यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार , अभिजीत नानवटकर , अनिल हामदापुरे , मुकुंद जोशी उपस्थित होते .
या विनापरवाना ढाणकी कॅनलच्या बाजूच्या रस्त्यावर जी ५४ खांबे स्नेहा गोल्ड कंपनीने त्यांच्या ठेकेदाराला उभी करण्यास सांगीतली ती खांबे उभी झाली मात्र विनापरवाना खांबे उभे करणाऱ्या कंपनीवर व संबंधीत ठेकेदारावर तसेच विज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी ही खांबे उभी केली अशा तिघावरही जिल्हाधिकारी यांनी गुन्हे नोंदविण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी आहे.
सादिक शेख मनसे , तालूका अध्यक्ष , उमरखेड .