
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव/ परंडा:-शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथील प्राणिशास्त्र पदवीत्तर अभ्यासक्रमात शुभांगी गायकवाड (चंदनशिवे ) यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. शिक्षण महर्षी रा गे शिंदे यांच्या जन्मशताब्दी निमित्त, महाविद्यालयाच्या वतीने शुभांगी गायकवाड यांना गोल्ड मेडल, सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र अध्यक्ष श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ सुनील शिंदे, उपप्राचार्य महेशकुमार माने, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अतुल हुंबे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. शहाजी चंदनशिवे, कनिष्ठ विभाग पर्यवेक्षक किरण देशमुख यांच्या हस्ते दिनांक ७ सप्टेंबर रोजी देण्यात आले.
शुभांगी गायकवाड यांना प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अतुल हुंबे व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले. घरातील व शेतामधील कामे करत जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून यश मिळवले आहे.
गायकवाड यांचे या यशाबद्दल सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. शुभांगी या पत्रकार रोहित चंदनशिवे यांच्या पत्नी आहेत. यावेळी प्रा प्रकाश सरवदे, प्रा डॉ सचिन चव्हाण, प्रा अमर गोरे, प्रा विशाल जाधव, डॉ विद्याधन नलावडे, प्रा जगन्नाथ माळी, प्रा.प्रशांत गायकवाड, प्रा विजय जाधव, प्रा देशमुख, अनिल जानराव उपस्थित होते.