दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव/भूम : तालुक्यातील मौजे कानडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका शाहीन काझी यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून दि.०५ सप्टेंबर २०२४ रोजी भारत विकास परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत शाखा बार्शी यांच्या वतीने राष्ट्र शिल्पकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. “शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते गुरगुरल्या शिवाय राहणार नाही” या उक्तीप्रमाणे काझी यांनी ज्ञानादाना सारखे पवित्र कार्य करत विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य होण्यासाठी गेली अनेक वर्षे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अविस्मरणीय व अलौकिक उत्कृष्ट कार्य करुन अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे त्यांनी काम केले. शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम असुन शिक्षण हाच विकासाचा खरा मंत्र आहे त्यानुषंगाने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांबरोबरच अनेकांना प्रोत्साहन देण्यासाठी काझी यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेत भारत विकास परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत शाखा बार्शी यांच्या वतीने उपक्रमशील शिक्षिका शाहीन काझी यांना शिक्षकांचा राष्ट्र शिल्पकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष संतोष जोशी, भारत विकास परिषदेचे सचिव सौ.वंदना कुलकर्णी, रोटरी क्लबचे अध्यक्ष अतुल कल्याणी,प्रवीण घुगे, प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे यांच्या हस्ते शाहीन काझी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
