
दै.चालु वार्ता
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :सर्वत्र नवरात्रोत्सव अत्यंत थाटामाटात संपन्न होत असताना व दुर्गादेवीच्या नामाचा जयघोष होत असतानाच आजच्या नवदुर्गांचा सन्मान करणे कवितेच्या बनातच्या संयोजकांनी योग्य समजलं. आजची नवदुर्गा हा पुरस्कार देऊन एकूण नऊ युवतींचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये 1- तुर पिक उत्पादनात राज्यातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवल्याबद्दल जयश्री भीमराव डोंगापुरे, राहणार रावणगाव. 2-जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल कु. हुरुसनाळे श्वेता सीमा बळीराम. 3- कोडींग एक्सपर्ट मध्ये सर्वप्रथम येण्याचा मान मिळवल्या बद्दल कु. इंद्रायणी सरस्वती सतीश पाटील. 4- एम. ए. इतिहास विषयात विद्यापीठातून सर्वप्रथम आल्याबद्दल कु. पनकोठटे शिरीन फातिमा सिराज. 5- एम. कॉम. मध्ये विद्यापीठातून सर्वप्रथम आल्याबद्दल कु. तनुजा संगीता रामराव तेगमपुरे. 6- याचबरोबर कु. ऋतुजा आनंद बिरादार ही आठवी शिष्यवृत्तीधारक बनल्याबद्दल. 7- एम.पी.एससी. मध्ये खुल्या प्रवर्गातून चौथा रॅक मिळवणाऱ्या कु. प्रणिता ज्योती तुकाराम होळसंबरे. 8- व्हिडिओ निर्मिती प्रकल्पात उदगीर तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवल्याबद्दल नीता मोरे आणि 9- रोटरी क्लब तर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या उषाताई तोंडचिरकर अशा एकूण नऊ जणांना आजची नवदुर्गा हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा पुरस्कार अमरावतीचे डॉ. अजय खडसे, प्रसिद्ध चित्रपट निर्माते विजय शिवतारे , चला कवितेच्या बनातचे संयोजक अनंत कदम, प्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम, प्रा. अनिल चवळे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रिझर्व्ह बॅंकेचे सेवानिवृत्त अधिकारी मुरलीधर जाधव, प्रा. राजपाल पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहन निडवंचे, शिवाजी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.