
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या बहुचर्चित मेगा लिलाव आज सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे होत आहे.दोन दिवस चालणाऱ्या या लिलिवात ५७७ खेळाडूंचा समावेश आहे.
मात्र यातील जास्तीत जास्त २०४ खेळाडूंवरच बोली लागणार आहे. कारण सर्व संघांमध्ये मिळून २०४ खेळाडूंतीच जागा शिल्लक आहे. लिलावापूर्वी १० संघांनी ४६ खेळाडूंना रिटेन केले आहे.आता २०४ खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्व संघांकडे मिळून एकूण ६४१.५ कोटी रुपये शिल्लक आहे.
पहिल्या सेटमध्ये जॉस बटलर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, मिचेल स्टार्क, या खेळाडूंचा समावेश होता. पहिलेच नाव पंजाब किंग्सचा माजी गोलंदाज अर्शदीप सिंग यांचे नाव आले. २ कोटी मुळ किंमत असलेल्या या खेळाडूव चेन्नई सुपर किंग्सने पहिली बोली लावली. त्यानंतर गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी बोली लावण्यास सुरुवात केली. १२ कोटी किंमत येईपर्यंत राजस्थान रॉयल्सने आघाडी घेतली होती. अर्शदीप सिंग हा RR कडे जातोय असे वाटत असताना सनरायझर्स हैदराबादने पॅडल उचललं आणि त्यांनी अर्शदीपची किंमत १५.५० कोटींपर्यंत नेले. त्यानंतर पंजाब किंग्सला RTM कार्ड वापरणार का असे विचारले गेले आणि त्यांनी १८ कोटीची बोली लावून अर्शदीपला पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले.
कागिसो रबाडाला १०.७५ कोटींत RCB ने आपल्या ताफ्यात घेतले. PBKS ला RTM वापरणार का असे विचारले गेले, परंतु त्यांनी नकार दिला. त्यानंतर आयपीएल २०२४ विजेत्या श्रेयस अय्यरचे नाव आले. कोलकाता नाईट रायडर्सने २ कोटींची बोली लावली. ७ कोटींपर्यंत पंजाब किंग्सने माघार घेतली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स शर्यतीत आले. PBKS vs DC यांच्यात मग शर्यत सुरू झाली. या दोन्ही संघांनी श्रेयसची किंमत १६ कोटींपर्यंत नेली आणि तोपर्यंत KKR ने माघार घेतली होती.
श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये मागील पर्वात कोलकाता नाइट रायडर्सला जेतेपद जिंकून दिले होते. त्याने आयपीएलमध्ये ११६ सामन्यांत ३१२७ धावा केल्या आहेत. पंजाब आणि दिल्ली माघार घेण्यास तयार नव्हते. RCB ने विराट कोहलीला २१ कोटींत आपल्या संघात कायम राखले होते आणि तो भारताचा सर्वात महागडा खेळाडू होता. दिल्ली व पंजाब यांनी ही रक्कमही ओलांडली. त्यानंतर हेनरिच क्लासेन ( २३ कोटी) याचा विक्रमही श्रेयससाठी मोडला गेला. SRH ने आफ्रिकेच्या फलंदाजाला २३ कोटींत संघात कायम राखले होते. पण, पंजाबने आज ११० कोटी शिल्लक रक्कमेतील सर्वात जास्त रक्कम श्रेयससाठी खर्च करण्याचा निर्धार केला होता.
पंजाब आणि दिल्ली या दोन्ही संघांना भारतीय कर्णधार हवा होता आणि श्रेयस हा दमदार पर्याय आहे. पण, दिल्लीच्या खात्यात ७३ कोटीच रक्कम होती, तर पंजाबकडे ११० कोटी शिल्लक होते. त्यामुळे पंजाबने रिक्स घेतली. २६.२५ कोटीपर्यंत बोली लागल्यावर दिल्लीने काही काळ वेळ घतेला. पण, पंजाबने २६.७५ कोटींत श्रेयसला आपल्या ताफ्यात घेतले.