
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : शिरूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या आंबळे येथे एका विवाहित महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शुक्रवार (दि.१४) उघडकीस आली. शिरूर पोलिसांनी याप्रकरणी भानुदास चंद्रकांत अनुसे ( रा. कळवंतवाडी ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आंबळे येथील रहिवासी विवाहित महिला व तिचा पती घरी असताना गावातच राहणारा आरोपी भानुदास अनुसे याने पीडित महिलेच्या घरात घुसून महिलेच्या गालावर हात फिरवून मला तू खूप आवडतेस असे म्हणत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत महिलेचा विनयभंग केला. तसेच महिलेला व तिच्या पतीला धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली.पीडितेने १४ मार्च रोजी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.
दरम्यान, या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी याप्रकरणी भानुदास अनुसे याच्याविरुद्ध विविध कलमानुसार पो. ह. आगलावे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार भोते करत आहेत.
शांतीनगर झोपडपट्टी शिरूर येथेही मद्यधुंद तरुणाकडून महिलेचा विनयभंग.
शिरूर येथील शांतीनगर झोपडपट्टी येथे फिर्यादी महिला व तिची मुले दि. १४ मार्च रोजी रात्री ९. ३० वाजता घरात असताना शांतीनगर झोपडपट्टी येथे राहणारा आरोपी सुरेश पोपट लोंढे हा मद्यधुंद अवस्थेत फिर्यादीच्या घरात घुसून सदर महिलेचा हात पकडत तिची छेड काढत अश्लील वर्तन केले आहे. फिर्यादी महिलेची तक्रार पोलीस हवालदार आगलावे यांनी दाखल केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार कोथळकर करत आहेत.