
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी-तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): पैठण तालुक्यातील चांगतपुरी शिवारातील शेतकऱ्यांच्या उस बिलाची व उस वाहुतुकीची रक्कम घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्यात जाऊन अधिकाऱ्यांना दि. 17 मार्च सोमवार रोजी निवेदन देऊन भेट घेतली. चालु हंगाम 2024 -25 मध्ये संबंधित शेतकऱ्यांनी शिवाजीराव ॲग्रो इंडस्ट्रीज प्राव्हेट लिमिटेड डेरा नांदर तालुका पैठण या कारखान्याला उस गाळपासाठी दिलेला असून चार महिने उलटूनही उसाचे बील मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. बिलासाठी कारखान्यात वारंवार चक्करा माराव्या लागत असून शेतकऱ्यांना फक्त आश्वासनच मिळत आहे. तात्काळ बिल न मिळाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.