
दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):-
येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतराव बाबुराव शेटकार यांचे अल्पशा आजाराने लातूर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दि. 16.03.25 रोज रविवारी सायंकाळी पाच वाजता वयाच्या 68 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर दि. 16 रोजी रविवारी रात्री 9 वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात शेटकार महाजन स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.
वसंतराव शेटकार हे जिल्ह्यामध्ये तात्या या नावाने ओळखले जात होते. ते राजकारण ,समाजकारण, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यामध्ये अग्रेसर होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सूना, नातवंडे असा मोठा परिवार असून बोरवेल चे व्यवसायिक अमोल शेटकार व अभिजीत शेटकार यांचे ते वडील होत .
त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.