
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
(नगरपालिकेचा सावळा गोंधळ चोहाट्यावर, सी.ई.ओ.व फिल्डवर कार्यरत कर्मचारी यांचे दैनंदिन कामांकडे विशेष दुर्लक्ष तर जनतेला धरलं सुविधेपासुन वेठीस)
=====================
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील मुख्य शहरातील नांदेड ते लातूर हायवे लगत असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतेच्या जवळ असलेल्या कराड नगर या परिसरातील प्रवेश करता वेळीच असलेल्या सार्वजनिक नळाचे कनेक्शन मागील अनेक दिवसापासून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत आहे याकडे नगरपालिकेतील कर्मचारी इंजिनियर व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष दुर्लक्ष होताना दिसून येत आहे व स्थानिकांनी नागरिकांनी दूरध्वनीवर संपर्क केल्यानंतर उडवा उडवी चे उत्तर मिळत असल्यास स्थानिक नागरिकांची नाराजी दिसून येत आहे
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना आदेश देऊन हजारों लिटर पाणी रस्त्यावर वाहत ते जाऊ नये म्हणून प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्य पूर्ण करतील का हा मात्र प्रश्न स्थानिक कराड नगर वाशीयच्या समोर प्रश्न निर्माण झाला आहे.
नांदेड ते लातूर हायवेलगत असलेल्या कराडनगर येथे प्रवेश करतानाच घाणीचे साम्राज्य व हजारो लिटर पाणी रस्त्यावर उन्हाळा असल्याकारणाने नगरपालिकेच्या लक्षात न आल्यामुळे स्थानिक जनतेला वेळेत पाणी न मिळत असल्याने नाराजीचा सूर जनतेतून थेट दिसून येत आहे
एकीकडे पाणी वाचवा. पाणी कमी जपून वापरा अशी भूमिका व जाहिराती करत असताना दुसऱ्या बाजूला नगरपालिकेची दुपटी भूमिका लोकांची हेळसांड असे प्रश्नांना स्थानिक नागरिकांना असंतोष निर्माण होताना दिसून येत आहे
म्हणून यावर उन्हाळ्याच्या दिवसात कठोर व सूक्ष्म नियोजन करणार का थेट सर्वसामान्य जनतेचा प्रश्न निर्माण होताना दिसून येत आहे.
———————————
स्थानिक नागरिक मनोगत
श्री बारमाळे ए.के
शिक्षणतज्ञ गल्ली मेंबर कराडनगर अहमदपूर,
“नगरपालिकेचा सावळा गोंधळ चोहाट्यावर आला हि स्थानिक नागरिकांनी दिलेली गिफ्ट.. की विविध कारातुन मार्चची सुट..? हि शोकांतिका म्हणावी लागेल.”
नगरपालिकेच्या विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे हि कार्यरत कर्मचारी यांची जबाबदारी
==================