
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
मोशी .श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन तीर्थक्षेत्र मोशी येथे मोठ्या उत्सवात हजारो भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात झाला. दिगंबरा दिगंबरा …..श्रीपाद वल्लभ दिगंबरा… श्री स्वामी समर्थ…. जय जय श्री स्वामी समर्थ… अशा भाविकांनी केलेल्या जय घोषाने संत नगर मोशी नगरी दुमदुमून गेली.
अनंत कोटी ब्रम्हांडनायक यांच्यातर्फे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित मंदिरावर विद्युत रोषणाई व पुष्पगुच्छ लावून लक्षवेधी फुलांची सजावट करण्यात आली होती.
श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिना निमित्त पंचक्रोशीतील अनेक भागातून भाविकांनी दर्शनासाठी संत नगर मध्ये उत्सवास दाखल झाले होते. स्वामींची पालखी दुपारी दोन वाजता संत नगर परिसरात दिगंबरा दिगंबरा …श्रीपाद वल्लभ दिगंबरा … जय घोषात परिसरातुन मिरवणूक निघाली होती.
या वेळी आमदार महेश लांडगे, कार्तिक लांडगे, धनंजय देसाई, सचिन गायकवाड अमोल दामले, सचिन करणार, गणेश चोरगे, आकांक्षा शिंदे आणि प्रसिद्ध रील स्टार आर्या घारे आणि प्रतीक्षा थोरात आदी मान्यवरासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पंकज भाऊ शिवाजी पवार आणि सर्व सेवेकरी यांनी अतिशय मेहनत घेऊन यशस्वी केले. यामुळे भक्तीचाराचा सोहळा अधिक भव्यदिव्य स्वरूपात मंगलमय वातावरणात साजरा झाला.
भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक चॅरिटी ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष पंकजभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चा प्रकट दिन सोहळा उत्सवात संपन्न झाला तसेच संस्थांकडून महाप्रसादाची उत्कृष्ट व्यवस्था केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.