
दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी- ज्ञानेश्वर साळुंके
अंबड : जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक महत्त्वपूर्ण सापळा रचून अंबड तालुक्यातील भणंगजळगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. या कारवाईत त्याला मदत करणाऱ्या एका खाजगी इसमालाही अटक करण्यात आली आहे. येथील ग्रामसेवक कार्यवाही युनिट जालना तक्रारदार 24 वर्ष आरोपी लोकसेवक जयसिंग रुपाला राठोड वय 55वर्ष ग्रामविकास अधिकारी नेमणूक-ग्रामपंचायत भणंगजळगाव तालुका अंबड जिल्हा जालना वर्ग श्रीभाऊ रावसाहेब खोजे वय 77 खाजगी इसम रा. भणंगजळगाव ता. अंबड जी. जालना तक्रारीचे स्वरूप
यातील तक्रारदार यांचे आजोबा व वडील हे मयत असून आजोबा यांचे नावे असलेले घर व मोकळी जागा तक्रारदार व तक्रारदार यांचे काकांचे नावे वारसाहक्काने करून नमुना (8 अ ) चे प्रमाणपत्र देण्याकरिता आलोसे यांनी तक्रारदार यांना 5000रु लाचेची मागणी केली व 3000रू यापूर्वीच स्वीकारून उर्वरित 2000 रुपये लाचेची मागणी केली.तक्रार प्राप्त 01/04/2025 तक्रारीची पडताळणी तक्रारदार यांनी दिनांक /01/04/2025 रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकास अंबड येथे लिखित तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने दिनांक 01/04/2025 रोजी अंबड येथे आरोपीताचे खाजगी कार्यालयात पडताळणी केली असता, आलोसे राठोड यांनी उर्वरित 2000 रु लाचेची मागणी करून ते स्वीकारण्याचे मान्य केले व खाजगी इसम श्रीभाऊ खोजे यांनी प्रोत्साहन दिले.सापळा कारवाई यातील आरोपी लोकसेवक याने आज दिनांक 2/04/2025 रोजी तक्रारदार यांचेकडून 2,000/- रुपये स्वतःचे खाजगी कार्यालयात पंचासमक्ष स्वीकारले असता आलोसे राठोड याला लाचेचे रकमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे.आरोपीचे अंग झडतीत मिळून आलेल्या वस्तू आलोसे राठोड याचेकडून लाच रक्कम 2,000/- रुपये पंचासमक्ष जप्त करण्यात आले तसेच आलोसे राठोड याची अंग झडती घेतली असता अंगझडतीत लाचेचे रकमे व्यतिरिक्त रोख 1320/- रू मिळुन आले असे एकूण रोख 3320/- रु मिळुन आले आरोपीताची घरझडती आरोपीताची घरझडती सुरू आहे. इतर माहिती आलोसे क्र.1 राठोड यांचे विरुद्ध कलम 7 व आरोपी क्र 2 श्रीभाऊ खोजे याचे विरुद्ध कलम 12 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे पोलीस ठाणे अंबड जि.जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे . आलोसे क्र 1 राठोड याला ताब्यात घेण्यात आले असून त्यास अटक करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. आरोपी क्र 1 याचे 2 मोबाईल ताब्यात घेण्यात आले असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.आरोपीताचे सक्षम अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे सापळा पथक पोलिस अंमलदार भालचंद्र बिनोरकर, अमोल चेके, गजानन घायवट, श्रीनिवास गुडूर, शिवलिंग खुळे मार्गदर्शक अधिकारी श्री.संदीप आटोळे,पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर,परिक्षेत्र छत्रपती संभाजी श्री.मुकुंद आघाव,अप्पर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र छत्रपती संभाजी नगर.
बाळु जाधवर पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वी. जालना यांनी केले आहे