दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी –
नांदेड / उस्माननगर :- मागील अनेक वर्षापासून उस्माननगर ता.कंधार येथे दरवर्षी येथील नागरिकांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, मागील तिव्र पाणीटंचाईच्या काळात सहा जणांचा बळी गेला होता. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. जिवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजना शासनाकडून मंजूर केली पण या योजनेतंर्गत गावकऱ्यांना तहान भागली नाही. अनेक महीन्यापासून सदरील योजना बंद पडल्यामुळे व बोअर, विहिर ,आड,हातपंप यांना पाणी येत नसल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते,. गोरगरिब जनता मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे .कोन्ही पाण्यासाठी विचारत नाही जाब म्हणून उस्माननगर ला मिळत नाही पाणीपुरवठा योजनेचा लाभ .
उस्माननगर हे कंधार तालूक्यातील सर्वात मोठे लोकवसतिचे गाव व बाजारपेठेचे गाव आहे. येथे दरवर्षी भिषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. लाखो रुपयेचा टॅकरने पाणीपुरवठा करून खर्च शासनाने केला . पाणीटंचाई काळात उस्माननगर येथील सहा जणांचा बळी गेला. या दरम्यान संपुर्ण महाराष्ट्रात सोनी टीव्हीवरील कार्यक्रमात ” सत्य मेव जयते ” टिव्ही शो कार्यक्रमात या सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांच्या टिमने चित्रीकरण करून ह्रदयाला पाझर फुटावा असे वास्तव जीवन दाखवले. तत्कालीन माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे यांनी उस्माननगर, शिराढोण , भुत्याचीवाडी अशी संयुक्त पाणी पुरवठा योजना शासनाकडून मंजूर करून आणली. चिंचोली येथील मन्याड नदीत विहीर खोदून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. गावातील चांगले असलेले रस्ते खोदून पाइपलाइन टाकली. गल्लोगल्ली पाईप लाईन टाकली. काही दिवस गांवकरी यांना पाणी मिळाले. गावकऱ्यांना वाटले पुढच्या पिढीला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही म्हणून खुश झाले. पण नशीब उस्माननगर वासियांचे की भंटकती काही पाट सोडत नाही. निवडणुकीत लोकप्रतिनिधी मोठ मोठे आश्वासन देऊन मतं मिळवून निवडून येतात. पण दिलेले आश्वासनाकडे कानाडोळा केला जातो. भाजप सरकारने देशात मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आश्वासन दिले आहे.परंतु उस्माननगर ता.कंधार येथील तिव्र पाणी टंचाई वर ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. तरीही पाण्यासाठी लाखो रुपये खर्च केला जातो. तरी येथील योजना फक्त कागदावरच दिसून येते. कामाचा दर्जा इस्टेमेट प्रमाणे दिसून येत नसते .तरी संबंधित अधिकारी यांच्याकडून काम पूर्ण झाले म्हणून बिल काढले जाते. उस्माननगर येथील भिषण पाणी टंचाई दुर करण्यासाठी तत्कालीन आमदार यांनी संयुक्तपणे पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती. याकडे कोन्ही जातीने लक्ष घालत नाहीत. कडक उन्हात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. खाजगी टँकरचे पाणी उस्माननगर वासीयांना विकत घ्यावे लागते . यामुळे मागील पाणीटंचाई काळाची पुर्णराव्रती न होऊ देता पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.