
दैनिक चालु वर्धा उपसंपादक – अवधूत शेंद्रे
१ कोटीचे बांधकाम २० लाखात गुंडाळण्याचा अधिकारी आणि कंत्राटदाराचा मनसुबा उघडकीस
३ वर्षांपासून शेतकऱ्यांची समस्या कायम
—————————————-
वर्धा – आष्टी :- तालुक्यातील धाडी येथील पाझर तलाव क्रमांक ३ येथील सांडवा वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीसह रस्त्याचे नुकसान झाले त्या पाझर तलावाच्या सांडवा दुरुस्तीचे काम जि.प.लघुसिंचन विभागामार्फत सध्या सुरु आहे मात्र सध्या स्तिथीत काळ्या रेती ऐवजी डस्ट आणि कन्हानरेतीचा वापर केला जातो आहे सिमेंट बॅग सुद्धा नामांकित कंपनीचे नाही आहे बांधकामावर अपुरा पाणी छिडकावं आणि जुन्या सळाखीचा वापर सुरु आहे त्यामुळे सदर बांधकाम अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे होत आहे शिवाय सबंधीत अधिकारी आणि कर्मचारी कामावर उपस्थित राहत नाही नागरिकात असलेल्या चर्चेनुसार सदर कंत्राटदार आणि संबंधीत अधिकारी हे दोघांमिळून बांधकामाचा कॉन्ट्रॅक्ट सांभाळते आहे त्यामुळे या ठिकाणी अधिकारी वर्ग निर्माणधीन कामात दोष काढणार नाही आणि कंत्राटदारावर कारवाई करणार नाही असं बोलल्या जाते बाकी सरकारी निधीचा अपव्यय करून निधी हडप करणार असल्याचे संकेत दिसत आहे यासाठी वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून उचित कारवाई करणे गरजेचे आहे
वर्ष २०२२ पासून पाझर तलावाच्या फुटलेल्या सांडव्यामुळे आमची शेतीची वहिवाट गैरसोईची झाली असून आहे संबंधित विभागाला वारंवार निवेदन देऊनही अधिकारी वर्ग झोपेचे सोंग घेतो आहे यासाठी संबंधित आमदार आणि खासदाराकडे दाद मागण्याचा मनसुबा आहे
साहेबराव झामडे शालिकराम झामडे
विठ्ठल टेकाम
वहीवाटग्रस्त शेतकरी
धाडी (जुनापाणी)