
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
नांदेड देगलूर
जागतिक आरोग्य दिनी उपजिल्हा रुग्णालय देगलूरला सर्वाधिक मोठ्या शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील प्रथम पारितोषिक मा. मुख्यमंत्री देवंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, मा. अजितदादा पवार, आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार यशवंतरावजी चव्हाण सभागृह मुंबई येथे *दिनांक ०७/०४/२०२५ रोज सोमवारी* प्रदान होणार असून हा पुरस्कार घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, उपजिल्हा रुग्णालय देगलूर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश अंबादासराव देवणीकर, डॉ. अनिल थडके, डॉ. विश्वनाथ मलशेटवार, मनिषा बोईनवाड इन्चार्ज सिस्टर,शस्त्रक्रिया गृह इन्चार्ज गौसिया मोमिन,
शस्त्रक्रिया गृह सहाय्यक शेख जमील अहेमद यांना शासनाने मुंबई येथे आमंत्रित केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल देगलूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नरेश देवणीकर व त्यांच्या सर्व टीम चे सर्व क्षेत्रातून कौतुक केले जात असून