
मंत्री मुरलीधर मोहोळांनी सूत्र हातात घेतली अन्…
लंडनवरुन मुंबईला येणाऱ्या व्हर्जिन अटलांटिक विमानाला एका प्रवाशाच्या वैद्यकीय आणीबाणीमुळे अचानक तुर्कीतील दियाबाकीर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. दियाबाकीर विमानतळ हे लष्करी विमानतळ आकाराने छोटे असल्याने विमानाचे हार्ड लँडिंग करावे लागले.
त्यामुळे गियरची समस्या निर्माण झाली. त्यामुळे दियाबाकीर विमानतळावर भारतीय प्रवासी तब्बल 30 तास अडकून पडले होते.
नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सुत्र हलवत भारतीय प्रवाशांना पुन्हा भारतात आणले. विमानाचे लँडिंग मुंबईला झाले. आणि प्रवाशांची सुखरुप सुटका झाली.
दियाबाकीर या विमानतळावर सुविधांची कमतरता व संर्पक साधनांच्या मर्यादा होत्या. हे विमानतळ हे इतर आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या तुलनेत लहान असल्याने त्याठिकाणी लहान प्रवासी विमानांचे आणि लष्करी विमानांचेच उड्डाण होते. त्यामुळे भारतीय प्रवाशांना येथे तब्बल 30 तास अडकून पडावे लागले होते.
विमानातील काही प्रवाशांच्या निकटवर्तीयांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संर्पक साधून मदतीची मागणी केली. मोहोळ यांनी तत्परतेने हे प्रकरण हाताळत अडकलेल्या प्रवाशांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी हवाई खात्या मार्फत संपर्क करून व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स यांच्याशी देखील चर्चा केली.
त्यानंतर वेगवान हालचाली करत विविध यंत्रणाशी संर्पक करत प्रवाशांना दिलासा देत त्यांना मुंबईला परतण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून विमान उपलब्ध झाल्याने प्रवाशांना तातडीने मायदेशी आणण्यात आले.
विशेष टीमवर टाकली जबाबादरी…
मुरलीधर मोहोळ यांनी दियाबाकीर विमानतळावर अडकलेले प्रवासी, व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी हवाई मंत्रालय मधील एक विशेष टीम नियुक्त केली. तसेच उत्तम समन्वयासाठी फॉरेन मिनिस्ट्रीच्या अधिकाऱ्यांची तसेच तुर्की मधील भारतीय राजदूताची देखील मदत घेतली. त्यामुळे एकत्रित प्रयत्नातून अडकलेल्या प्रवाशांना तुर्की बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय यांनी देखील मोहोळ यांच्याशी चर्चा केली.
सुविधा मिळाल्या…
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या विनंतीनुसार, दियाबाकीर विमानतळावर भारतीय प्रवाशांची काळजी घेण्यात आली. प्रवाशांना सँडविच, फळे व अल्पोपहार देण्यात आले. लहान मुलांना आवश्यक साधने तसेच प्रवाशांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली.