
प्रिती झिंटाचंही होणार कमबॅक; कशी असेल कहाणी ?
सुपरहिरो सिनेमा ‘क्रिश ४’ ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. २००३ मध्ये हृतिक आणि प्रिती झिंटाचा ‘कोई मिल गया’ आला. नंतर याचा सीक्वेल ‘क्रिश’ २००६ मध्ये आला.
२०१३ मध्ये ‘क्रिश ३’ आला. आता १४ वर्षांनी क्रिश ४ ची चर्चा आहे. विशेष म्हणजे हृतिक या सिनेमात ट्रिपल रोलमध्ये दिसणार आहे. तसंच तो स्वत: सिनेमाचं दिग्दर्शनही करणार आहे.
‘क्रिश ४’ मध्ये टाईम ट्रॅव्हलचा असणार आहे. ‘अव्हेंजर्स’प्रमाणेच सिनेमा बनवण्यात येणार आहे. हृतिक रोशन यामध्ये ट्पिल रोलमध्ये दिसेल. तसंच कोई मिल गया नंतर प्रिती झिंटा पुन्हा क्रिश फ्रँचायझीमध्ये कमबॅक करणार आहे. क्रिश २ आणि ३ मध्ये हृतिकचा डबल रोल होता. आता प्रिती झिंटा आहे म्हटल्यावर हृतिक ट्रिपल रोलमध्ये दिसेल. ही एक टाईम ट्रॅव्हल स्टोरी असणार आहे. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यामध्ये जोडलं जाणार आहे. आता सिनेमात प्रियंका चोप्राचंही कमबॅक होणार का हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
क्रिश ३ मध्ये कंगना राणौत आणि विवेक ओबेरॉय यांचीही भूमिका होती. या सिनेमामुळे हृतिक आणि कंगनाचं अफेअर चर्चेत होतं. नंतर त्यांच्यात काहीतरी बिनसलं आणि त्यांचं भांडण चव्हाट्यावर आलं. एकमेकांना पाठवलेले इमेल्सही त्यांनी व्हायरल केले. आता क्रिश ४ मध्ये खलनायकाची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अद्याप सिनेमाचं शूट सुरु झालेलं नाही. हृतिक सध्या ‘वॉर २’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यानंतर तो ‘क्रिश ४’ वर काम करणार आहे. सिनेमाचं बजेटही जास्त असणार आहे.