
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
——————————————
नांदेड देगलूर
उच्चशिक्षित नव दांपत्यांचे शैक्षणिक कागदपत्रासह संसार उपयोगी वस्तूची झाली राख;
गतवर्षी २ मे रोजी नागनाथ देवारे या मोठया मुलाचे लग्न झाले आहे. लग्नाला एक वर्ष पूर्ण होतो ना होतो तोच त्यांनी राहत असलेल्या बेडरूमसह देवघरास शॉर्ट सर्किट मुळे आग लागून लग्नात नववधूच्या वडिलाने दिलेले संसार उपयोगी वस्तू कपाट, सोपासेट, पलंग गादी, ड्रेसिंग टेबल, कुलर, फॅन, लग्नातील नवीन कपडे यासह नववधूचे अडीच तोळ्याचे दागिने व उच्चशिक्षित नव दांपत्यांचे १० वी पासून ते पदवी व पदविकाचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे सह संपूर्ण संसार उपयोगी वस्तूची जळून राख झाली.
—————————————–
आदमपुर: बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील शेतकरी गोविंद महादू देवारे यांच्या माधव देवारे या मुलाच्या नावे असणाऱ्या घरात महावितरण कंपनीच्या जिवंत तारेच्या शॉर्टसर्किटमुळे सोमवार २१ रोजीच्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आग लागून घरातील रोक रक्कम दाग -दागिनेसह संसार उपयोगी वस्तू व धान्य जळून तब्बल दहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
येथील अल्पभूधारक शेतकरी गोविंद महादू देवारे हे अनेक वर्षापासून काबड कष्ट करीत आपल्या नागनाथ व माधव या दोन मुलांसाठी मागील पाच वर्षांपूर्वी नवीन घर बांधकाम केले. त्या घराच्या लगत गावाला विद्युत पुरवठा करणारा विद्युत पोल आहे. त्यावर जिवंत तारे ओढलेले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात विजेचा लपंडाव सुरू असल्याने घरातील सर्वजण घराच्या छतावर झोपले असताना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याच लोंबकाळणाऱ्या तारेच्या घर्षण होत शॉर्टसर्किटचे ठिणग्या पडत सदर घरास आग लागुन घरातील कपाटसह कपाटातील अडीच तोळे सोन्याचे दागिने, एक लाख २३ हजार रक्कम, नवीन कपडे, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, घरात असलेला सोपासेट, पलंग गादी, ड्रेसिंग टेबल, कुलर, फॅन, लॅपटॉप, मोबाईल यासह अन्न धान्य व संसार उपयोगी वस्तू जळून जवळपास दहा लाख रुपयाचे या शॉर्टसर्किटच्या आगीत जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती येथील भाजपचे बिलोली तालुकाध्यक्ष मारोती राहीरे, सरपंच (प्र) दिलीप भुसावळे, माजी सरपंच प्रभाकर पेंटे, अरविंद पेंटे, गुत्तेदार गंगाधर हालबुर्गे , अहमद पठाण यांना कळताच त्यांनी संबंधित घटनेची माहिती तहसीलदार व महावितरण कंपनीस कळवल्यानंतर महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अमित त्रिवेदी, मंडळ अधकारी लक्ष्मण पंगे, तलाठी मिलिंद सुपेकर यांनी भेट देत शॉर्ट सर्किटमुळे जळालेल्या घराची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावे अशी घर मालकासह गावकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.