
दैनिक चालु वार्ता उमरगा प्रतिनिधी – मनोजकुमार गुरव
उमरगा (धाराशिव)
सामर्थ्य कल्याणकारी संस्था उमरगा आणि श्री सिद्धेश्वर विद्यालय कसगी त्यांच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींचे वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सामर्थ्य कल्याणकारी संस्थेचे पदाधिकारी व विद्यालयातील सहशिक्षक श्री बी.जी पाटील सर श्री जी एन कांबळे सर सौ मेहकरकर मॅडम प्राध्यापक डाळिंबे सर श्री गुरव सर हे उपस्थित होते.
यावेळी इयत्ता आठवी नववी दहावी अकरावी बारावी वर्गातील मुलींना सामर्थ्य कल्याणकारी संस्था उमरगाच्या वतीने मोफत सॅनिटायझर नॅपकिन वाटप करण्यात आले.