
दैनिक चालु वार्ता कोल्हापूर प्रतिनीधी – पंडित चौगुले
कोल्हापूर दि. 1 :शिवसेना( उ बा ठा) नूतन कार्यकारणी जाहीर मध्ये जिल्हाप्रमुख पदी मा. ॲड. श्री रविकिरण इंगवले साहेब यांची निवड करण्यात आली.
युवा नेतृत्व जिल्हाप्रमुख झाल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही संघर्ष व संघटन तर रविकिरण इंगवले यांच्याकडूनच शिकावे असे कोल्हापूर जिल्ह्यात बोलले जाते कोल्हापूर जिल्ह्यातील युवा वर्ग त्यांच्या एका हाकेला निस्वार्थपणे हजर राहतात व साथ देतात, अशा युवा नेतृत्वाला शिवसेना( उ बा ठा) जिल्हाप्रमुख केल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात काय घडेल काय सांगता येत नाही.
माननीय श्री रविकरण इंगवले साहेब यांचा सत्कार सतीश रास्ते ( सामाजिक कार्यकर्ते)व पंडित चौगुले दैनिक चालू वार्ता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.