
दैनिक चालू वार्ता उपसंपादक धाराशिव- नवनाथ यादव
धाराशिव/भूम (प्रतिनिधी):
तालुक्यातील आरसोली गावात गुरुपौर्णिमेनिमित्त एक अनोखा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. माजी सरपंच प्रशांत काका मुंडेकर यांच्या संकल्पनेतून आणि प्रशांत काका मुंडेकर युवा मंचच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक बी. एस. भगत व शिक्षकवृंद जे. एम. आगळे, टी. एन. ढोरे, पी. पी. थाटे, आर. यू. काळे, ए. एस. कोल्हाळे, ए. एन. तांबोळी, आर. बी. चंदनशिवे, कैलास सातपुते, तसेच शिक्षिका श्रीमती एस. टी. सुरवसे, के. जे. आगळे, कविता नागटिळक, वाघमारे यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रशांत मुंडेकर, राजकिरण गोयकर, रमेश सुरवसे, अनुरथ चंदनशिवे, सुनील पाटील, दत्ता गाढवे, भागवत गोयकर, भागवत खराडे, महादेव गोयकर, सुदाम नागटिळक, संदीप खराडे, नितीन पाटुळे, बाबा अंधारे, सोमनाथ मुंडेकर यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन नितीन गुंजाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन कैलास सातपुते यांनी मानले.
गुरुपौर्णिमेच्या या निमित्ताने आरसोली गावाने शिक्षकांविषयीचा आदर व्यक्त करत एक आदर्श घालून दिला.