
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर:- उस्माननगर पोलिस स्टेशन च्या
कर्तव्यदक्ष, सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या
सौ.लोपामुद्रा दत्तराव आनेराव/(सौ.लोपामुद्रा सुशील कुबडे) या
द.आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेल्या टांझानिया देशातील किलोमांजारो या शिखरावर जाण्यासाठी रवाना झाल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील रोहिपिंपळगावातील एका गरीब शेतकऱ्यांच्या पोटी जन्म झाला.पहिली ते चौथी जि.प.शाळा वसंतवाडी ,पाचवी ते सातवी जि.प.शाळा रोहिपिंपळगाव,आठवी ते दहावी कै.यादवरावजी शाळा चिकाळा येथे शिक्षण झाले. पुढील शिक्षण मुदखेड व नायगाव येथे केले.वडीलांना खेळाची आवड असल्याने स्वतः ला स्पर्धेत जाता आले नाही म्हणून, आपली चार एकर शेती पडीत ठेवून स्वतः त्यांची प्रॅक्टिस घेतली . मुला – मुलीत कुठलाही भेदभाव न करता त्यांनी आपल्या मुलीला मुलाच्या बरोबरीने शेतामध्ये सराव करून घेतला . अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षी मुलीने सन-२००० मध्ये अखिल भारतीय स्पर्धेत रोपे पदक मिळवून गावाचे व जिल्ह्याचे नाव कमविले.खेळायच्या वयात ११ वर्षापासून शेतात, नदीत, टेकडीवर सराव करून राज्यस्तरीय स्पर्धेत ३५ -४०वेळेस सुवर्णपदक जिंकले,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १५ – २० विजेतेपद मिळवून आपल्या गावाचे नाव व महाराष्ट्राचे नाव उज्वल केले .सन २००६ महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली.२००७ मध्ये महाराष्ट्र पोलीस स्पर्धेत सहा विजेते पदक मिळवून जनरल चॅम्पियनशिप मिळवुन आपले नाव व जिल्ह्याचे नाव केले. लगातार दोन वर्षे अखिल भारतीय स्पर्धेत सुवर्ण, रोपे पदक मिळवून आपल्या राज्याचे व पोलीस दलाचे नाव उज्वल केले तसेच सन २०१० चांगल्या कामगिरीमुळे पोलीस महासंचालक पदकाने जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित केले. तसेच अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. आपले कर्तव्य निभावत, घरांची जिम्मेदारी सांभाळून दोन मुलाचे पालन करत शारीरिक शिक्षण विषयात PHD प्राप्त केली आहे. हे सर्व करीत असताना सुद्धा खडतड मेहनत करून आज आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले टांझानिया देशातील किलीमांजारो शिखर सर करण्यासाठी रवाना झाले ., त्याबद्दल नांदेड परिक्षत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप ,जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार , सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, डॉ.अश्विनी जगताप उपविभागीय पोलिस अधिकारी,उपविभाग कंधार , उस्माननगर पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार , पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर,उपनिरीक्षक सुनिल सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संजय मुंडे उस्माननगर येथील पत्रकार बांधव व उस्माननगर पोलिस स्टेशन मधील सहकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.