
दैनिक चालु वार्ता उस्माननगर ( प्रतिनिधी )-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- कंधार तालुक्यातील बारूळ येथील गणेश विजयकुमार रायेवार हे कंधार तहसील कार्यालय मध्ये सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महसूल विभागाणे त्यांची पदोन्नतीवर नायब तहसीलदार या पदावर देगलूर जि.नांदेड येथील तहसील कार्यालय येथे निवड केली. त्यांची निवड झाल्याबद्दल कंधार तहसीलचे नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर, सहाय्यक महसूल अधिकारी अविनाश पानपट्टे ,लोकमतचे पत्रकार गोविंद शिंदे यांनी त्यांचा शाल,पुष्पहार घालून यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी महसूल विभागातील सर्व कर्मारी,पत्रकार बांधव व बारूळ येथील सामाजिक कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.