
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
डहाणू, दि. ९ ऑगस्ट –जागतिक आदिवासी दिनानिमित्त दृष्टीकोन सामाजिक संस्थेच्या वतीने गंजाड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी हजेरी लावून सांस्कृतिक वैभव, रूढी-परंपरा आणि हक्कांचा गौरव केला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचे मनमोकळ्या स्वागताने सत्कार करण्यात आला. थेट प्रक्षेपणाद्वारे (Live) कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. पेसा कायद्याविषयी सविस्तर माहिती देत आदिवासी समाजाच्या अधिकारांवर प्रबोधन करण्यात आले. तसेच प्रबोधनपर गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम, रूढी-परंपरा प्रदर्शन आणि जागरण करणारे भगत यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.या कार्यक्रमात रॅली काढून मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच आशागड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.मान्यवर पाहुण्यांमध्ये पालघर विधानसभा आमदार राजेंद्र गावित, बोईसर विधानसभा आमदार विलास तरे, जिल्हा अध्यक्ष वसंत चव्हाण यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.दृष्टीकोन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अभिजीत देसक, गंजाड ग्रामपंचायत प्रभारी सरपंच तथा संस्थेचे सहसचिव कौशल कामडी, पालघर जिल्हा समन्वयक तथा निकणे उपसरपंच सुदाम मेरे, खजिनदार डॉ.अक्षय गडग, सदस्य व तंटामुक्त अध्यक्ष प्रविण वरठा, मुंबई पोलीस सचिन वरखंडे, माजी शिक्षक सुरेश गडग, लखमा वायेडा (एसटी महामंडळ सेवानिवृत्त कर्मचारी), ग्रामपंचायत सदस्य कैलास दळवी, कल्पेश ठाकरे, विनोद गडग, काशी वायेडा, मनिषा कोदे, अनिता कोठारी यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप सांस्कृतिक वारशाचे जतन, आदिवासी हक्कांची जाणीव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत करण्यात आला.