
शिंंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार !
कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळेच राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दुसरीकडे राजकीय नेते आपल्या सोईचा पक्ष शोधून उड्या मारत आहेत.
दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कधीकाळी बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधून मोठी माहिती समोर येत आहे. ठाकरेंना या जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तुपे हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
तुपे यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर संभाजीनगराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तुपे यांच्यासोबत त्यांचे काही समर्थक पदाधिकारीही शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे.
लवकरच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी संभाजीनगरात राजकीय गोळाबेरीज केली जात आहे. असे असतानाच त्र्यंबक तुपे यांनी साथ सोडणे हा ठाकरेंसाठा धक्का असल्याचे मानले जात आहे.