
नेमकं काय घडलं ?
उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन यांचं नाव ऐकताच अनेकांना धडकी भरते, हा तोच व्यक्ती आहे, ज्यांनी स्वत:च्या सख्ख्या काकाला तोफेच्या तोंडी बांधून उडून देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयानंतर त्यांनी उत्तर कोरियामध्ये आपली प्रचंड दहशत निर्माण केली.
मात्र यावेळी किम जोंग उन यांचा एक वेगळाच चेहरा जगाला पाहायला मिळाला. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. उत्तर कोरियाचे सैनिक या युद्धात रशियाच्या बाजुने लढत आहेत.
या युद्धामध्ये उत्तर कोरियाचे जे सैनिक मारले गेले, त्यांना श्रद्धांजली देताना पहिल्यांदाच किम जोंग उन सर्वांसमोर जाहीरपणे रडले आहेत. रिपोर्टनुसार रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये उत्तर कोरियाचे सैन्य रशियाच्या बाजूनं लढत आहे. या युद्धामध्ये ज्या उत्तर कोरियाच्या सैनिकांचा मृत्यू झाला त्यांचं पार्थिव रशियामधून विमानानं उत्तर कोरियामध्ये आणण्यात आलं. त्यांना पूर्ण सन्मानानं शेवटचा निरोप देण्यात आला. यावेळी स्वत: किम जोंग उन यांनी तिथे उपस्थित राहून सैनिकांच्या मृतदेहावर मेडल लावलं. यावेळी त्यांना आश्रू अनावर झाले. जगातील सर्वात निर्दयी हुकूमशाहा अशी किम जोंग उन यांची ओळख आहे. मात्र किम जोंग उन यांचा हा नवा चेहरा पाहून तिथे उपस्थित असणारे सर्वजण भावुक झाले.
एवढचं नाही तर यावेळी किम जोंग उन यांनी तिथे उपस्थित असलेल्या एका युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकाच्या चिमुकलीच्या डोक्याचं चुंबन देखील घेतलं. हा प्रसंगी खूपच भावनिक असा होता. किम जोंग उन रडत होते. या प्रसंगामुळे तिथे उपस्थित असलेला प्रत्येक जण भावूक झाला, अनेकांनी तर आश्रूद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
दरम्यान त्यानंतर किम यांनी तिथे ठेवलेल्या प्रत्येक शेवपेटी जवळ जाऊन सॅल्यूट केला, इतर सैन्य अधिकाऱ्याची भेट घेतली. उत्तर कोरियाच्या मीडियानुसार हा पहिलाच असा प्रसंग आहे, जेव्हा किम जोंग उन हे रडताना दिसले आहेत. या युद्धामध्ये उत्तर कोरियाचे अनेक सैनिक मारले गेले आहेत.