
दैनिक चालू वार्ता चाकुर प्रतिनिधी- किशन वडारे
————————————
जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ कार्यालय हुतात्मा स्मारक येथे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक ज्ञानोबा चामले आर्य यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रथम स्वातंत्र्यसैनिक स्वामी रामानंद तीर्थ व माणिक हरिपंत आयाचित यांच्या प्रतिमेचे पूजन स्वातंत्र्यसैनिक नागनाथ टेकाळे व आयाचित वीर पत्नी होळीकर सुकुमार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत संपन्न झाले आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तदनंतर सर्व स्वातंत्र्य सैनिक यांचा संघाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला तसेच राज्यस्तरीय ग्रंथ मित्र पुरस्कार प्राप्त धनंजय पवार व महात्मा फुले राजश्री शिक्षक पुरस्कार प्राप्त लाल बहादूर विद्यालयाचे अक्षय कुलकर्णी संजय गारटे यांचा सन्मान संघाचे संचालक जहांगीर सय्यद बाळकृष्ण होळीकर अमित मेहेत्रे ग्रंथालय कार्यकर्ते कुमार भालेराव दगडू वंगवाड लता सगर यांनी मान्यवरांचा सत्कार केला या ध्वजारोहण कार्यक्रमास दयानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक एस पी बिराजदार अशोक भोंडे तसेच ग्रंथालयाचे कार्यकर्ते नामदेव कास्ते नागरगोजे पाटलोबा सुशील मेकले महापालिकेचे कर्मचारी इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्य वहा राम मेकले यांनी केले तर आभार बाळकृष्ण होळकर यांनी मांनले