
दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक -अवधूत शेंद्रे
————————————–
वर्धा – आष्टी :- तालुक्यातील धाडी गावातील रिठ मौजा ईसापुर, लाखनवाडा आणि काकडदरा येथील सोयाबीन शेत पिकाचे प्रचंड प्रमाणात झालेले नुकसान आणि सततच्या धो – धो पावसामुळे नदी नाले दुथडीभरून पुराने वाहिले त्यात अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली याचे पंचनामे करून योग्य तो आर्थिक मोबदला देण्यात यावा यासाठी धाडी ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप भाकरे यांच्या नेतृत्वात इतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात धडक दिली पुढे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सततच्या धो -धो पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यात मोझ्याक नावाच्या पिक रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे यात हाती येत असलेले सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हातून निसटून गेले आहे सोबतच ईसापूर मौज्यात जाणारा पांदनरस्ता जाम नदीच्या पुलापासून ते अजाबराव उईके यांच्या शेतापर्यंत वाहून गेला त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी वहिवाट राहिली नाही यासाठी जाम नदीचे खोलीकरण जबाबदार असल्याचे म्हटले आहे त्या अनुषंगाने संबंधित विभागाने योग्य कारवाई करून पांदन रस्ता नवीन मंजूर करून सुव्यवस्थित करून देण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे यावेळी कांग्रेस तालुका अध्यक्ष रवींद्र गंजीवाले, अंकुश राऊत, मंगेश लांडे,ज्ञानेश्वर पापडकर, राहुल गुडधे, नरेश चौधरी पोलीस पाटील युवराज चोरे, हरिभाऊ राऊत, गौरव गावंडे, गोपाल नेहारे आदी उपस्थित होते