
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भारताला विश्वगुरू बनविण्याच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अपार परिश्रम घेणारे, नवनवीन उपक्रम राबवणारे आणि भारताची छाप जागतिक स्तरावर उमटवणाऱ्या आदरणीय नेतृत्वाचा वाढदिवस अभिनव संकल्पनेतून पार पडावा या उद्देशातून पतंजली योग समिती इंदापूर यांच्या माध्यमातून एकदिवसीय योग शिबिर पार पडले.
देशाने जगाला दिलेली देणगी असलेल्या योगाचा प्रचार आणि प्रसार आदरणीय मोदीजी सातत्याने करत असतात त्यांच्या अथक आणि अविरत प्रयत्नातूनच जागतिक योगा दिवस देखील साजरा होतो यानिमित्ताने मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त योग शिबिर आयोजित करण्याची संकल्पना पुढे आली व आज त्यांच्या वाढदिवसाच्या पावन मुहूर्तावर हे शिबिर पार पडले.
माणसाला समृद्ध जीवन जगण्यासाठी सर्वात जास्त महत्वाचे असलेल्या शारीरिक संपदेची देणगी देणाऱ्या योगाचा प्रसार करून मोदींजींनी समस्त देशवासीयांना सुदृढ व समाधानी जगण्याचा मूलमंत्र दिला, त्याच मार्गाचा अवलंब करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे आम्ही साऱ्यांनीच ठरवले असल्याचे मत माने यांनी व्यक्त केले.
या योग शिबिर कार्यक्रमास इंदापूर वासियांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. विविध योगासने केल्यानंतर मोदीजींचा केक कापण्याचा देखील कार्यक्रम यावेळी करण्यात आला. तसेच मोदीजींच्या निरोगी आयुष्यासाठी हवन देखील करण्यात आले. यावेळी युवा नेते श्री प्रविण माने यांनी देखील होमात समिधा वाहिल्या.
यावेळी युवानेते प्रविण माने यांसह किरण गानबोटे, राम आसबे, जयकुमार शिंदे, मल्हारी घाडगे, प्रशांत गिड्डे, रविंद्रजी परब, शरदजी झोळ, रामेश्वरजी साठे, चंद्रकांतजी देवकर, अशोकजी अनपट, भालचंद्रजी भोसले,डॉ.विक्रम पोतदार, सायराभाभी आत्तार, वर्षाताई नागणे, जयश्रीताई खबाले, उमाताई झोळ, मेघाताई भंडारी, जयश्रीताई सरवदे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रतिक्रिया – भारतीय ऋषी परंपरेतील योग जगभर पोहोचवण्याचे कार्य भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी केले आहे. जीवन निरोगी व यशस्वी करायचे असेल तर प्रत्येकाने नियमितपणे योग, प्राणायाम आणि ध्यान अंगीकारले पाहिजे. ७५व्या वर्षीही नरेंद्र मोदीजींची कार्यक्षमता, तेजस्विता आणि ओजस्विता ही योगसाधनेचेच फलित असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री.प्रविण माने यांनी व्यक्त केले.