
नाटो देशांच्या लढाऊ विमानांचं उड्डाण !
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे, गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धामध्ये प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्त हानी झाली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी अमेरिकेकडून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे, मात्र रशियानं या दबावाला न जुमानता युद्ध सुरूच ठेवलं आहे.
एकीकडे हे युद्ध सुरू असतानाच आता युरोपमध्ये आणखी एक मोठं युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे, मोठी बातमी समोर आली आहे. हा रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
युरोपवर आता आणखी एका युद्धाचे ढग दाटून आले आहेत. पोलंडकडून असा दावा करण्यात आला आहे की. रशियानं आपले दोन फायटर जेट बाल्टिक समुद्रात असलेल्या पेट्रोबाल्टिक तेल आणि गॅस साठ्याच्या क्षेत्रात घुसवले आहेत. असं करून रशियानं सुरक्षा क्षेत्राच्या सीमांचं उल्लंघन केल्याचा दावा देखील पोलंडकडून करण्यात आला आहे. दरम्यान रशियाचे फायटर जेट बाल्टिक समुद्रात असलेल्या पेट्रोबाल्टिक तेल आणि गॅस साठ्याच्या क्षेत्रात घुसल्यानं आता कोणत्याही क्षणी नाटो देश आणि रशियामध्ये युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
नाटोचे प्रवक्ता एलसन हॉर्ट यांनी आता रशियाला कडक इशारा दिला आहे,रशियानं उचलेलं हे पाऊल खूप बेजवाबदार असून, युद्धाला आमंत्रण देणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान नाटो देशाकडून इटलीच्या एफ-35 लढावू विमानांनी सीमेच्या दिशेनं उड्डान केलं आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये आधीच युद्ध सुरू आहे, नाटो देशांकडून या युद्धामध्ये वारंवार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत आहे, या पार्श्वभूमीवर रशियाच्या या कृतीनं जगाची झोप उडाली आहे. दुसरीकडे नाटोकडून देखील आता रशियाला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू झाली असून,नाटोच्या लढाऊ विमानांनी देखील उड्डान केलं आहे.
पोलंडच्या सैन्यांनी केलेल्या दाव्यानुसार बाल्टिक समुद्रात असलेल्या पेट्रोबाल्टिक तेल क्षेत्रामध्ये अत्यंत कमी उंचीवरून रशियाच्या विमानांनी उड्डान केलं आहे. त्यानंतर रशियाची ही घुसखोरी थांबवण्यासाठी आता नाटोच्या वतीनं इटलीचे लढावू विमान या क्षेत्रात दाखल झाले आहेत, तसेच रशियाला युरोपीय संघाकडून देखील इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे आता या सर्व परिस्थितीकडे संपूर्ण जागाचं लक्ष लागलं आहे, यामध्ये अमेरिकेची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे.