
शिवसेनेच्या मंत्र्यांना काय सांगितलं…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांची कानउघाडणी केल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदेंची काम करणारा नेता म्हणून ओळख
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ओळखले जातात. थेट जनतेपर्यंत जावून काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती आपली समस्या घेऊन एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचू शकते, इतकं सोपं त्यांना भेटणं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत. एकनाथ शिंदे हे गल्लोगल्लीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळी आस्था आहे.
कार्यक्षम एकनाथ शिंदे आपल्या अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज?
एकनाथ शिंदे हे दिवसरात्र जनतेसाठी आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी काम करत असले तरी शिवसेनेचेच इतर मंत्री तसं काम करत नसल्याची एकनाथ शिंदे यांच्या मनात खंत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याच मंत्र्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती समोर आली आहे.