
रीता भट्टाचार्य चा मोठा खुलासा…
प्रसिद्ध गायक कुमार सानू आणि त्यांची पहिली पत्नी रीटा भट्टाचार्य यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रीटा भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत कुमार सानू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
कुमार सानू यांनी 1986 मध्ये रीटा भट्टाचार्य यांच्याशी विवाह केला होता, त्यानंतर 1994 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर कुमार सानू यांनी सलोनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. रीटा यांनी कुमार सानू यांच्यावर घरगुती हिंसाचार, फसवणूक आणि मुलांकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय. या मुलाखतीमुळं कुमार सानू आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Rita Bhattacharya यांनी ‘फिल्म विंडो’ला दिलेल्या मुलाखतीत कुमार सानू यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यांनी सांगितलं की, कुमार सानू यांनी घटस्फोटाच्या वेळी अत्यंत वाईट वागणूक दिली होती. तर घटस्फोटानंतर कुमार सानूंचा मला बंगला मिळावा यासाठी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मदत केल्याचा प्रसंगही रीटा यांनी सांगितला.
रीटा यांनी कुमार सानू यांच्यावर आरोप केला की, ते घर सोडून जाताना घरातील सामानसुद्धा घेऊन गेले.स्वत:ला तसंच मुलांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी मोठा संघर्ष केल्याचंही त्यांनी सांगितलं. हा संघर्ष सुरू असतानाच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मदत केली होती, हे सांगायला त्या विसरल्या नाहीत.