
अमेरिकेपासून 4000 किलोमीटर, चीनपासून 5000 किलोमीटर आणि रशियापासून जवळपास 5500 किलोमीटरवर एक बेट आहे. या द्वीपावर अमेरिकेचा गुप्त लष्करी तळ आहे. क्वाजालीन आणि एबे हे ते दोन द्वीप आहेत.
ही दोन्ही बेटे उणेपूरे 20 किलोमीटर सुद्धा नाही. पण अमेरिकेला सामारिकदृष्ट्या हे बेट महत्त्वाचं आहे. येथील छोटे छोटे बेटे हे लष्करी हालचालीसाठी अमेरिकेला फायदेशीर आहेत. येथून चीन आणि रशियावर लक्ष ठेवण्यात येते. भविष्यात युद्ध भडकले तर येथून मारा करणे अमेरिकेसाठी सहज शक्य आहे.
हे बेट कायम ताब्यात राहावे यासाठी अमेरिका अनेक पट पैसा खर्च करतो. कोट्यवधी रुपये खर्च करते. येथील स्थानिकांना मोठी मदत करण्यात येते. या बेटावर हक्क सांगण्याचा चीनने पण प्रयत्न केला. त्यासाठी मोठी रक्कम खर्च केली. पण चीनची डाळ काही शिजली नाही. सामारिक दृष्ट्या हे बेट अत्यंत महत्त्वाचं असल्याने त्यासाठी अमेरिका वारेमाप खर्च करतो.
प्रशांत महासागरात आहे क्वाजालीन
क्वाजालीन हे बेट, लष्करी तळ, बंदर प्रशांत महासागरात आहे. येथे जवळपास 10 हजार लोक राहतात. क्वाजालीनमध्ये केवळ 16 किलोमीटर परिसर आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिका या जागेचा वापर लष्करी तळासारखा करतो. चीन वा रशियन मिसाईल हल्लाविरोधात येथे सुरक्षा कवच सुद्धा आहे. अमेरिकेच्या सुरक्षा प्रणालीत या बेटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
येथे अमेरिकेच्या अनेक मिसाईलचे परीक्षण करण्यात आले आहे. अमेरिका चीन वा रशियावर हल्ला चढवणार की नाही याची सर्वात अगोदर रंगीत तालीम येथे समजते. हे ठिकाणी आगाऊ इशारा देण्याचे काम करते. क्वाजालीन अमेरिकेचे हायटेक बेस आहे. तर एबे या बेटावर केवळ लोक राहतात. या बेटावरील लोक क्वाजालीन येथे मजूर म्हणून वा इतर कामे करतात. पण त्यांना गुप्त लष्करी तळावरील संवेदनशील भागापासून दूर ठेवण्यात येते.
अमेरिका देते इतके भाडे
क्वाजालीन बेटावर अमेरिकेचे 1300 सैनिक तैनात आहेत. याठिकाणी अत्याधुनिक रडार यंत्रणा, शस्त्रास्त्र, क्षेपणास्त्र आहेत. येथे सैनिकांसाठी खास घरं, सावर्जनिक स्विमिंग पूल, कंट्री क्लब, गोल्फ कोर्स, बॉलिंग एली, रुग्णालय, हॉटेल आणि इतर अनेक सोयी-सुविधा आहेत. या भागाला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाते. या बेटासाठी अमेरिका कमीत कमी 26 दशलक्ष वार्षिक भाडे मोजते.