
होळीच्या दिवशी मुलींसोबत बाबाचे काळे कृत्य; आश्रमाचं हादरवून सोडणारं सत्य समोर !
देशात कोणत्यात कोपऱ्यात मुली सुरक्षित नाहीत हे चित्र घटड असलेल्या घटनांवरून दिसून येत आहे. दिल्ली येथील वसंत कुंज येथे श्री शारदा इंस्टीट्यूट मॅनेजमेंटमधील स्वामी चैतन्यानंद सरस्वती याने 17 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर बाबा फरार आहे. बाबा मुंबईत असल्याचं देखील पोलिसांना कळलं आहे. आता त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पूर्ण प्रयत्न करत आहेत. एवढंच नाही तर, मुंबई सोडून परदेशात जाऊ नये म्हणून बाबा विरोधात लुकआऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.
एफआयआरमध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपांनुसार, बाबा मध्यरात्री मुलींना त्याच्या खोलीत बोलवायचा आणि विचित्र मेसेज देखील पाठवायचा… ‘बेबी I Love You… आज तू खूप सुंदर दिसत आहेस… जवळ ये ना…’ असे मेसेज तो विद्यार्थिनींना पाठवायचा. विद्यार्थिनींनी नकार दिल्यानंतर बाबाची तीन महिलांची लेडी गँग विद्यार्थिनींवर दबाव टाकत असे…
होळीच्या दिवशी नक्की काय घडलं?
एवढंच नाही, होळीच्या दिवशी देखील बाबाने विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केलं. बाबाने विद्यार्थिनींना एका रांगेत उभं राहण्यासाठी सांगितलं… ओम बोलून बाबाने विद्यार्थिनींना त्याच्या समोर वाकायला लावलं… त्यानंतर भांगेत कुंकू भरलं आणि गालावर रंग लावला… याचदरम्यान एका विद्यार्थिनीने आरोप केले की, बाबा तिला बळजबरी स्पर्श करत होता आणि सतत बेबी – बेबी बोलत होता…
विद्यार्थिनींच्या बाथरुमबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे
धक्कादायक गोष्ट म्हणजे विद्यार्थिनींच्या बाथरुमबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते आणि लाईव्ह फुटेज बाबा त्याच्या मोबाईलमधून बघत होता. मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या 75 मुली बाबाच्या हॉस्टेलमध्ये राहतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून त्यांच्या प्रत्येक हलचालीवर बाबा लक्ष ठेवून आहे… हे त्या विद्यार्थिनींना माहिती देखील नव्हतं…
बाबाचं शेवटचं लोकेशन
बाबाचे काळे कृत्य समोर आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण महत्त्वाचे पुरावे हाती लागतील… यावर पोलिसांचा विश्वात आहे. बाबाचं शेवटचं लोकेशन मुंबई असल्याचं देखील पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. त्यामुळे बाबा देश सोडून पळून जाऊ नये म्हणून लूकआऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.